बेकायदा कत्तलखाना चालविणाऱ्या दोघांनी चोरून वापरली वीज गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.२३ डिसेंबर):-संगमनेर येथे बेकायदेशिर कत्तलखाना चालविणाऱ्या दोघांनी चोरून वीज वापरल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दोघांना कायदेशीर नोटिसा बजावूनही त्यांनी १ लाख २९ हजार ५४२ रुपयांचा दंड भरला नाही. त्यामुळे जोर्वे विभाग कक्ष अभियंत्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.शाहीद इर्शाद कुरेशी व जहीर इर्शाद कुरेशी (दोघेही रा.सुकेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
वीज चोरीचा प्रकार सरकार लॉन्स, जमजम कॉलनी परिसरात दोन महिन्यांपूर्वी उघड झाला होता.पोलिसांच्या ही चोरी समोर आली होती. पोलिसांनी शहर अभियंता राजेंद्र शिंदे यांना कळविल्यानंतर त्यांनी सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये यांना कारवाईचे आदेश दिले होते.
यात २ हजार ३८० यूनिट वीज चोरी केल्याचे सिद्ध झाले.तसेच विद्युत कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार दंडात्मक नोटीस मालकांना बजावली होती.असे असताना सुद्धा दंड न भरल्याने या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.