संगमनेर प्रतिनिधी(दि.२७ डिसेंबर):-संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरी,घरफोडी,दरोड्याच्या घटना कायम व वारंवार होत असतानाच आता गणपतीला हार व प्रसाद द्यायचा सांगत हातचलाखी दाखवून महिलेचे पावणेदोन तोळ्यांचे सोने चोरून नेण्यात आले आहेत. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.यातील तक्रारदार महिलेचे पानाचे दुकान असून, सोमवारी दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या टपरीसमोर एकजण आला.त्याने तंबाखू विकत घेऊन गणपती मंदिर कोठे आहे, अशी विचारणा केली.तेथे जाऊन हार व प्रसाद मला मंदिरातील पुजाऱ्यांना दान करायचा असल्याचे त्याने सांगितले.त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या खिशातून शंभर रुपयांच्या पाच नोटा काढल्या. ‘मी सोने-चांदीचे दुकान टाकले आहे.मला मंदिरात पाचशे रुपयांचे दान करायचे आहे’,असे सांगितले.दान करायच्या या पैशांना सोने लावून दान करायचे असल्याचे त्याने सांगितले.त्यामुळे महिलेने गळ्यातील सोन्याची चैन त्याच्या हातात दिली. त्यावर त्याने त्याच्याकडील शंभर रुपयांच्या एका नोटेत फिर्यदीची चैन गुंडाळली व चारशे रुपये फुलांच्या पिशवीत टाकून पिशवीला गाठ मारून ‘पिशवी तुमच्या दुकानातील देवापुढे अर्धातास ठेवा व नंतर मंदिरात देऊन ‘टाका’ असे तो म्हणाला.महिलेने पिशवी घेऊन दुकानातील फोटोपुढे ठेवली. त्यानंतर तो माणूस निघून गेला.काहीवेळाने महिलेने पिशवी उघडून पाहिली असता त्यात शंभर रुपयांच्या चार नोटा व झेंडूच्या फुलांची माळ व दोन बिस्किटचे पुडे दिसले. मात्र,सोन्याची चैन दिसली नाही.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच या महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
