मराठी चित्रपट ‘क्लब ५२’ मध्ये अभिनेत्री यशश्री व्यंकटेशने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे जिंकले मन
प्रतिनिधी (स्नेहा मडावी):-नव्याने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय वाटते हे जाणून घ्यायचे असेल चित्रपट गृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे राहिले कि प्रेक्षकांची कुजबुज ऐकायला मिळते कि, यात जेव्हा चित्रपटातील जोडी उत्तम वाटली अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते.
त्यावेळी कलाकार खऱ्या अर्थाने आनंदी होतो.नुकताच ‘क्लब ५२’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.या चित्रपटामध्ये अभिनेत्री यशश्री व्यंकटेश आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी मुख्य व्यक्तीरेखा साकार केली आहे. या दोघांनी ही वेगवेगळ्या माध्यमातून काम केले असल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढणे साहजिकचं आहे.त्यांच्या चित्रपटातील भूमिकेचे कौतुक झाले.पण त्या दोघांची जोडीही छान आहे अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.
या चित्रपटात यशश्रीवरती चित्रित करण्यात आलेली लावनी. साताऱ्याला गेली मी, सांगलीला गेली मी…मला पाहू नका वरखाली,मी आहे तमाशेवाली… ही लावनी प्रसिद्ध गायिका रेश्मा सोनवणे यांनी गायली असून करण आणि दर्शन,गीतकार – सुजाता पवार हे आहेत.सध्या ही लावणी ट्रेडिंगमध्ये आहे. बाकीचे मंत्रमुग्ध करणारी गीते आदर्श शिंदे,मधुर शिंदे, यशश्री व्यंकटेश,चंद्रकला दासरी यांनी गायली आहेत.
तर गीतकार बजरंग बादशहा,अजय वाघमारे,सुजाता पवार, यांनी ही गीते लिहली आहेत. या चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम,शशांक शेंडे,राधा सागर,भरत ठाकूर आणि टीना सोनी हे आहेत.