सहजयोग परिवार अहमदनगरच्या वतीने नाताळ उत्साहात संपन्न;बालगोपाळांच्या हस्ते केक कापून ख्रिसमस साजरा
अहमदनगर (दि.२६ डिसेंबर):-प.पु.माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार,अहमदनगरच्या वतीने ख्रिसमस निमित्त सहज भुवन, गोविंदपुरा,अहमदनगर येथे ख्रिसमस पूजेचे नियोजन करण्यात आले.
या वेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी आलेल्या सर्व सहजयोग्यांचे स्वागत केले. शिरूर येथील सहजयोगी अजय गुंजाळ यांनी भजणे म्हणून सर्वाना मंत्रमुग्ध केले. या वेळी गणेश अथर्व शीर्ष पठण करून येशू ख्रिस्तांचे 108 नावे घेण्यात आली.या वेळी सर्व बालगोपालांच्या हस्ते केक कापून येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी अहमदनगर जिल्ह्यासह पुणे बीड जिल्यातील सहजयोगी मोठया प्रमाणात उपस्थित होते.फटाक्याची आतिषबाजी करून ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला,शेवटी सर्वाना महाप्रसाद देऊन पूजेची सांगता करण्यात आली.