अहमदनगर (दि.२६ डिसेंबर):-एमआयडीसी परीसरात तिरट नावाचा जुगार खेळणा-या ५ इसमांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून तब्बल १,४१,२१०/-रु किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
ही कारवाई दि.२६ डिसेंबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की एमआयडीसी मध्ये सनफार्मा चौक ते निंबळक जाणारे रोडवर शेळके पेट्रोलपंपापासुन थोड्या अंतरावर शनैश्वर पान स्टॉलचे शेजारी काही इमस तिरट नावाचा जुगार खेळत आहेत आत्ता गेल्यास मिळून येईल अशी माहिती मिळाल्याने सपोनि सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे काही इसम गोलाकार बसुन तिरट नावाचा जुगार खेळतांना मिळुन आले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे १,४१,२१०/-रु.किमतीचा मुदद्देमाल व तिरट खेळाचे साहित्य मिळुन आले आहे. त्यांचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु रजि.नंवर ११८२/२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग श्री. संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/ राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/योगेश चाहेर,पोहेकॉ/साबीर शेख, पोहेकॉ/देशमुख,पोहेकॉ/शिंदे पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/ धुमाळ यांनी केली आहे.