पिंपळगाव तुर्क ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त मा.सरपंच गोकुळ वाळुंज यांना सरपंच सेवा संघाचा “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार” प्रदान.. !
अहमदनगर (दि.२६ डिसेंबर):-दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा २०२३ चा “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तूर्कचे मा.लोकनियुक्त सरपंच गोकुळ वाळुंज यांना प्रदान करण्यात आला.
अहमदनगर येथील झोपडी कॅन्टीन जवळील माउली संकुल सभागृह येथे हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे,सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे आदी उपस्थित होते.
सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, पदक,फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते.मा.सरपंच वाळुंज यांनी आजपर्यंत विविध सामाजिक,शैक्षणिक या क्षेत्रातील वंचित उपेक्षितांना स्वार्थ भावनेने मदत केली आहे.या कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघाने दिलेला “राज्यस्तरीय पुरस्कार” निश्चितच आनंददायी आहे,या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे बळ मिळेल,अशी प्रतिक्रिया मा.सरपंच गोकुळ वाळुंज यांनी दिली.