आम आदमी पक्षाच्या वतीने ‘मनुस्मृती दहन दिन’ साजरा;डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून भारतातील सर्व माता-भगिनींना न्याय दिला-शहराध्यक्षा शितलताई कांडेलकर
पुणे प्रतिनिधी (दि.२७ डिसेंबर):-२५ डिसेंबर १९२७ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते.या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला ‘मनुस्मृती दहन दिन’ म्हणून देशात अनेक ठिकाणी साजरा केला जातो.
पुणे जिल्ह्यात आम आदमी पक्षाच्या वतीने मनुस्मृती दहन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.यावेळी आम आदमी पार्टीच्या शिक्षक आघाडीच्या शहराध्यक्षा शितलताई कांडेलकर म्हणाल्या की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून भारतातील सर्व माता-भगिनींना न्याय दिला.
मनुवाद्यांच्या विचारांना जाळल्यामुळे आज सर्व भारतातील महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.यावेळी शहराध्यक्ष सुदर्शनजी जगदाळे,शहराध्यक्ष प्रशांत कांबळे अनुसूचित जाती आघाडी,महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई भोसले, शहराध्यक्षा शिक्षक आघाडी शितलताई कांडेलकर,पदमा साळुंखे,मिलिंदभाऊ ओहळ, आराध्य सोनवणे,शुभम दादा, व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.