Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह 

संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र भूमीत संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

सन १९५२ मध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज उपस्थितीत हिवरगाव पावसा येथे ऐतिहासिक साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.त्या ऐतिहासिक घटनेच्या निम्मिताने ७२ वर्षापासून हिवरगाव पावसा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो.सोमवारी सकाळी 8:00 वाजता घटस्थापना होऊन सप्ताह कार्यक्रमास सुरुवात झाली.दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप पहाटे ४ ते ६ काकडा,भजन सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी २ ते ४ भजन सायांकाळी ६ ते ७ सामुदाईक हरिपाठ सायांकाळी ७ ते ९ किर्तन व महाप्रसाद असे असेल.

ह.भ.प. गणेश महाराज एरंडे (झोळे), ह.भ.प. कृष्णानंद महाराज (श्रीरामपूर), ह.भ.प. दीपक महाराज देशमुख (सुगाव),ह.भ.प. कावेरीताई भुमरे अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था, ह.भ.प. कविराज महाराज झावरे (पारनेर), ह.भ.प. अनिल महाराज तुपे (नाशिक), ह.भ.प. सौ.सोनालीताई महाराज फडके (कानगाव त्ता.दौंड) तसेच ह.भ.प. स्वामी अरुणनाथ गिरी महाराज (श्रीरामपूर) यांचे काल्याचे किर्तनाचा कार्यक्रम होणार आहेत.सप्ताह कार्यक्रमास सर्व भजनी मंडळ, संस्थांचे पदाधिकारी,तरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ,खंडोबा भक्तांनी,परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव ट्रस्टचे सर्व विश्वस्त तसेच ग्रामपंचायत हिवरगाव पावसा व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page