Maharashtra247

अवैध सोरट धंद्यावर कारवाई करत दोघांना पकडल्याने ८ ते १० जणांनी पोलिसाला आणि होमगार्ड यांना केली बेदम मारहाण

श्रीरामपूर (दि.२७ डिसेंबर):-श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे शनिवारी आठवडे बाजार असल्याने येथे गस्त घालण्यासाठी पोलिस हवालदार रवींद्र खळेकर हे होमगार्ड सुनील देवकर व किशोर खरात यांना सोबत घेऊन गेले.दरम्यान बाजारात गस्त घालताना शाळेच्या भिंतीलगत काहीजण सोरट खेळताना त्यांना आढळून आले.पोलिसांना पाहून काही जुगार खेळणाऱ्यांनी धूम ठोकली.

यात किशोर रंगनाथ मांजरे व दीपक सांवत बर्डे या दोघांना पोलिसांनी पकडले.त्यांनी या पोलिस व होमगार्ड यांच्याशी हुज्जत घालायला सुरवात केली.हे पाहून नऊ ते दहा लोक तेथे आले त्यांनी या दोघांची खळेकर यांच्या ताब्यातून सुटका करत पथकाला धक्काबुक्की करत खळेकर यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला.

खळेकर हे जखमी झाल्याने स्वतःला वाचवण्यासाठी पळाले. गावातील काही लोक त्यांच्या मदतीला धावले व हल्ल्यातून सुटका केली.याबाबत हवालदार खळेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब रंगनाथ मांजरे, सौरभ अण्णासाहेब गायकवाड, सौरभ गायकवाड, अरुण पोपट खैरनार, सुनील बाजीराव तोरणे, भाऊसाहेब बारकू गायकवाड, सुभान बाबामिया शेख, पिंट्या खैरनार, महेश बाबासाहेब मांजरे आदींसह चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page