नगर पुणे महामार्गावरील वाहतुकीत ३१ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत बदल जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आदेश
नगर प्रतिनिधी (दि.२७. डिसेंबर):-१ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायी दरवर्षी येत असतात.यामुळे नगर पुणे महामार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.नगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा आणि नगरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन दिवसांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.३१ डिसेंबर ते २ जानेवारीला सकाळी ६.०० वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढले आहेत.बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा, दैव दैठण,धावतगाव,पिंपरी कोळंदर,उक्कडगाव, बेलवंडी,नगर-दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ,मढेवडगाव,काष्टी,दौंड-सोलापूर-पुणे महामार्गामार्गे पुण्याला जावे लागेल.नगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कायनेटिक चौक,केडगाव बायपास,अरणगाव बायपास,लोणी व्यंकनाथ,मढेवडगाव,काष्टी,दौंड-सोलापूर-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आहे.