Maharashtra247

जीवे ठार मारण्याची पन्नास हजार रुपयांची सुपारी देणाऱ्यासह त्याच्या साथीदारांना भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद

नगर प्रतिनिधी (दि.२७.डिसेंबर):-दि.८ ऑगस्ट २०२२ रोजी देवदरी गावच्या ग्रामसभेत ग्रामसभा घेऊन त्यामध्ये देवदरी रिसॉर्ट हॉटेलची नोंद लावून ग्रामपंचायत कर भरण्यासाठी ठराव घेण्यात आलेला होता. त्याबाबत देवदरी येथील ग्रामसेवक यांनी रिसॉर्टचे मालक विठ्ठल तुकाराम वामन यांना नोटीस बजावनी केली होती.त्यावेळी विठ्ठल वामन याने ग्रामसेवक याने अरविंद शेळके यांचे जवळ यातील जखमी फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली.दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी यातील जखमी फिर्यादी संभाजी शिवाजी वामन (वय 40 वर्षे रा.देवगाव ता.जि.अहमदनगर) हे काम करीत असलेल्या राजीव गांधी पतसंस्था,दिल्लीगेट शाखा,अहमदनगर येथून त्यांचे कडील बजाज कंपनीची डिस्कवर मो.सा.गाडीवरून जात असताना पाठीमागून मोपेड गाडीवर अनोळखी तिघेजण आले त्यांनी फिर्यादी यांना आडवून त्यांचे हातातील लाकडी दांडक्यांनी फिर्यादी यांना हातापायांवर मारून त्यांचे दोन्ही पाय व एक हात फँक्चर करून झालेल्या झटापटीत फिर्यादीचे गळ्यातील गळ्यातील सोन्याची चैन व खिश्यातील 10,000/- रूपये गहाळ झाले होते गर्दी जमा होऊ लागल्याने ते पळून गेले बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं 358/2022 भादविक 307,326,324,427,143, 147,148,149,506 सह आर्म ॲक्ट 4/25,3/25 प्रमाणे दि.21/08/2022 रोजी जखमी फिर्यादी यांचे दवाखान्यातील जबाब वरून गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात यापुर्वी अविनाश बाळासाहेब ठोंबरे वर्षे (रा.सिद्धार्थ नगर,बौद्ध वस्ती समाज मंदिर जवळ,ख्रिश्चन कब्रस्तान,अहमदनगर) यास अटक करण्यात आली होती.तसेच गुन्हा घडल्या पासून 1)विठ्ठल तुकाराम वामन वय 41 वर्षे रा. देवगाव ता.जि.अहमदनगर 2)नानासाहेब उर्फ नानाभाऊ बबन वामन वय 41 वर्षे रा.देवगाव ता.जि.अहमदनगर 3)विर दिपक सोनवणे वय 35 वर्षे रा.रंगभवन,शंकर मंदीर जवळ,सर्जेपुरा ता.जि. अहमदनगर 4)राहुल उर्फ बंडू उत्तम घोरपडे वय 31 वर्षे रा.मुन्सीपल कॉलनी,लक्ष्मी आई मंदीर जवळ,सिद्धार्थ नगर ता.जि.अहमदनगर 5)कृष्णा उर्फ बच्चू सखाराम काते वय 30 वर्षे रा.पंचशिल शाळेजवळ,बौद्ध वस्ती, सिद्धार्थ नगर ता.जि. अहमदनगर असे गुन्हा घडले पासून फरार होते.दि.22/12/2022 रोजी यातील 1)विठ्ठल तुकाराम वामन वय 41 वर्षे रा.देवगाव ता.जि.अहमदनगर 2)नानासाहेब उर्फ नानाभाऊ बबन वामन वय 41 वर्षे रा.देवगाव ता.जि.अहमदनगर 3)विर दिपक सोनवणे वय 35 वर्षे रा.रंगभवन,शंकर मंदीर जवळ,सर्जेपुरा ता.जि. अहमदनगर 4)राहुल उर्फ बंडू उत्तम घोरपडे वय 31 वर्षे रा.मुन्सीपल कॉलनी,लक्ष्मी आई मंदीर जवळ,सिद्धार्थ नगर ता.जि.अहमदनगर 5)कृष्णा उर्फ बच्चू सखाराम काते वय 30 वर्षे रा.पंचशिल शाळेजवळ,बौद्ध वस्ती, सिद्धार्थ नगर ता.जि. अहमदनगर आरोपी हे भिंगार परीसरात मिळून आल्याने त्यांना सदर सदर गुन्ह्यात अटक करून सदर गुन्ह्याचा तपास केला असता यातील आरोपी नं 01 विठ्ठल तुकाराम वामन याने बाकी आरोपी यांना 50,000/-रूपयांची सुपारी दिल्याची कबुली दिल्याने वरील आरोपी नं 01 ते 5 यांना मा.न्यायालाय समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने प्रथम 04 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली त्यानंतर दि.26/12/2022 रोजी परत त्यांना 02 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे तसेच सदर गुन्ह्यात वापरलेली 01 स्कॉर्पीओ गाडी व 02 मो.सा या गुन्हयाचे तपास कामी जप्त केल्या आहेत.गुन्ह्याचा तपास पोसई/एम.के.बेंडकोळी हे करीत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमर देशमुख,पोसई/एम.के.बेंडकोळी,सफो/कैलास सोनार,पोना/राहुल द्वारके,पोकाँ/रमेश दरेकर,पोकाँ/अमोल आव्हाड, पोकाँ/सुधाकर पाटोळे,पोकाँ/महादेव निमसे,पोकाँ/अविनाश कराळे,चापोकाँ/संजय काळे,चापोकाँ/भागचंद लगड, चापोकाँ/अरूण मोरे, होमगार्ड / भागवत केदार, होमगार्ड / वैभव सुसे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page