निझर्णेश्र्वर विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न
संगमनेर प्रतिनिधी (दि.२८ डिसेंबर):-कोरोना काळात सुरक्षेचा उपाय म्हणून शालेय क्रीडा स्पर्धांना मागील दोन वर्षापासून असलेल्या स्थगितीमुळे शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत.आता नियमितपणे शाळा सुरू झाल्याने निझर्णेश्र्वर विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुण्यतिथी निमित्त अभिवादन करुन मशाल प्रज्वलित करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बी.डी. काळे यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे संतुलित असणे म्हणजे आरोग्य पूर्ण जीवन म्हणता येईल आणि म्हणूनच मुद्दाम वेळ काढून आपण ठरवून शारीरिक व्यायाम,चालणे,धावणे,खेळणे योगासने,प्राणायाम,ध्यान विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे.जेणेकरून भावी पिढी ही सदृढ व निरामय जीवन जगू शकते असा आशावाद व्यक्त केला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच आशाताई जोंधळे,तालुका वन कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ जोंधळे,तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे,उद्योजक सीताराम जोंधळे,डॉ.दत्तात्रय जोंधळे,संगमनेर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.रमेश शिंगोटे,हनुमंत जोंधळे,गोरख जोंधळे,भगवान पवार,दीपक भोसले आदी उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक खेळांबरोबरच वैयक्तिक खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री. खरात सर,रावताळे सर,घोडे सर,वाळे सर,खेमनर सर,शितल मॅडम,भालेराव भाऊसाहेब,दिलखुश मामा उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय क्रीडा विभागप्रमुख श्री.डी.बी. गोसावी सर यांनी केले तर आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.डी.पी.वाकचौरे सर यांनी मानले.