देवगड विद्यालयातील आंतर शालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न,हिवरगाव पावसा ग्रामपंचायतिचे शालेय क्रीडा स्पर्धेला मोलाचे सहकार्य
संगमनेर प्रतिनिधी (दि.२८.डिसेंबर):-क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्रीडा प्रकार हे प्रौढांपासून लहानांपर्यंत सर्वांना शारीरिक सुदृढतेसाठी आवश्यक असतो.आजच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या तंदुरुस्तीसाठी खेळाला अनन्य साधारण महत्व आहे.याच जाणीवेतून आपल्या विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी रंगाचे हेलियम वायुतील फुगे मोठ्या संख्येने प्रसन्न तसेच उत्साहवर्धक वातावरणात मोकळ्या आकाशात सोडून व श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी तसेच हिवरगाव पावसा गावचे प्रथम नागरिक (सरपंच) श्री.सुभाष गडाख सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील खेळांचे महत्व व गरज या विषयांवर मोलाचं मार्गदर्शन केले.देवगड देवस्थानचे विश्वस्त- सामाजिक कार्यकर्ते श्री. यादवरावजी पावसे यांनी अनेक जुन्या शालेय आठवणींना उजाळा देत मार्गदर्शन केले.तसेच चंदनेश्वर विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.कैलास रहाणे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बी.आर.पावसे सर यांनी व्यक्त केले.या क्रीडामहोत्सवात प्रथम दिवशी तीन वयोगटातील सामूहिक खो-खो,व कबड्डी या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात करत धावण्याची स्पर्धा 100 मी-200 मी-400 मी-800 मी,गोळा फेक,लांब उडी,स्लो सायकल,कुस्ती हे क्रीडा प्रकार घेण्यात आले.तिसऱ्या दिवशी संगीत खुर्ची,क्रिकेट, फनी गेम्स मध्ये पोता शर्यत, तीन पायी शर्यत,इत्यादी अनेक क्रीडाप्रकार घेण्यात आले.या क्रीडामहोत्सवातील विशेष बाब म्हणजे या सर्व क्रीडा प्रकारात मुलानं बरोबरीने मुलींनी देखील उत्साहाने भाग घेवून विशेष यश संपादन केले.या महोत्सवातील सहभागी यशस्वी स्पर्धकांचे विशेष अभिनंदन करून अशा उत्साहवर्धक क्रीडा महोत्सवाची मोठ्या आनंदाने आज सांगता झाली.या महोत्सवात क्रीडांगण तयारी साठी गावातील उत्साही, मदतशील,प्रगतिशील शेतकरी श्री.सुधाकर दवंगे,श्री.बजरंग पावसे,आणि श्री सोमनाथ दवंगे यांनी मोफत ट्रॅक्टर सेवा पुरवली त्यांचे विद्यालयाने विशेष अभिनंदन मानले.या कार्यक्रम प्रसंगी हिवरगाव पावसाचे प्रथम नागरिक सरपंच श्री.सुभाष गडाख सर, देवगड देवस्थानचे विश्वस्त श्री.काशिनाथ पावसे,देवगड देवस्थानचे विश्वस्त श्री. यादवरावजी पावसे,श्री.गणेश दवंगे,ग्रामपंचायत सदस्य श्री.किरण पावसे,शालेय समितीचे अध्यक्ष श्री.बजरंग पावसे,डॉ.प्रमोद पावसे,डॉ. शांताराम वर्पे,उपप्राचार्य कैलास रहाणे सर,श्री. सुधाकर दवंगे,श्री.सोमनाथ दवंगे.जेष्ठ क्रीडा शिक्षक सुरेश राहाणे सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमेश पावसे सर,श्रीमती.हांडे मॅडम,श्री. नेहे सर,श्री.तातळे सर,श्री माने सर,श्री.वाघ सर,श्री. थोरात सर,श्रीमती.भालेराव मॅडम,श्री.तोरकडी सर , श्री.किरण शेळके सर , श्री.शांताराम पवार मामा,श्री. रवींद्र भालेराव मामा तसेच गावातील विविध कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी,सदस्य, पालकवर्ग आदि मान्यवर उपस्थित होते.