एटीएम कार्डची अदलाबदल करून मशिन मधून बावीस हजार रुपये केले भामट्याने लंपास
संगमनेर प्रतिनिधी (दि.२८.डिसेंबर):-एटीएम कार्डची अदलाबदल करीत एका भामट्याने एटीएम मशीनमधून २२ हजार ६०० रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.२३) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास युनियन बँक ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखेतील एटीएम केंद्रात घडला. याप्रकरणी सतीश प्रकाश चौधरी (मूळ रा.लहित,ता. अकोले,हल्ली रा. पंपिंग स्टेशन,कासारा दुमाला रस्ता, मालपाणी हेल्थ क्लबजवळ, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार अधिक तपास करीत आहेत.