Maharashtra247

शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग राहुरी येथील घटना शिक्षक जेरबंद 

राहुरी प्रतिनिधी (दि.२८. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.राहुरी तालुक्यातील निंभेरे जिल्हापरिषद शाळेतील एका मद्यपी शिक्षकाने सहावी व सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अंगाला नको तिथे स्पर्श करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे.राहुरी पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून आरोपी मदन रंगनाथ दिवे (रा.दाढ बुद्रुक,तालुका राहता)याच्या विरोधात कलम ३५४ (अ) पोस्को ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील करत आहेत.

You cannot copy content of this page