अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८.डिसेंबर):-राजकीय वर्चस्वादातून योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरुणांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या केल्या प्रकरणी स्वामी ऊर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांनी हा निकाल दिला.इतर आरोपींची सुटका करण्यात आली.यात सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी काम पाहिले.दोषी ठरविलेले आरोपी गायकवाड यांनी राळेभात बंधूंचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैद, भारतीय हत्यार कायदा कलम 3/27 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.याबाबत माहिती अशी की,दि.28 एप्रिल 2018 रोजी ही घटना घडली होती.जामखेड शहरात दोन राजकीय गटात अनेक वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. राजकीय शुभेच्छाचा पोस्टर फाडल्याच्या रागातून सायंकाळच्या समावेश एका हॉटेलात योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या करण्यात आले होते. या घटनेमुळे जामखेड संपूर्ण नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. राजकीय वर्चस्वाचा हत्येपर्यंत मोठी खळबळ झाली होती.पोलिसांनी सदर गुन्ह्यात गोविंद दत्तात्रय गायकवाड,विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने,कैलास विलास माने,प्रकाश विलास माने,काका बबन गर्जे,दत्ता रंगनाथ गायकवाड,सचिन गोरख जाधव,विनोदकुमार सोमारिया रमिश,अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर,गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गायकवाड वगळता इतरांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली.तत्कालीन पोलीस उपधीक्षक सुदर्शन मुंडे हे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी होते.खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. राजकीय वर्चस्व वादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी अंतिम लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता.
Trending Topics:
Trending
- मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणले ५ गावठी कट्टे,सोनईत विक्रीची तयारी मात्र ‘एलसीबी’च्या धडक कारवाईने खेळ खल्लास..!
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
