नगर प्रतिनिधी (दि.२८.डिसेंबर):-भारत सरकारने वाहतुक व विक्रीस बंदी घातलेला 28,25,000/- रुपये (अठ्ठाविस लाख पंचविस हजार रु.) किंमतीचा 5,500 किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा व एक आयशर टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.बातमीची हकिगत अशी की,श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमूद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पथक पेट्रोलिंग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सोलापुरकडुन अहमदनगरच्या दिशेने एक तपकिरी रंगाचे आयशर कंपनीचा निळे रंगाची ताडपत्री बांधलेला टेम्पोमध्ये बंदी असलेला मांगुर जातीचा मासा विक्री करीता घेवुन जात आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.अनिल कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्थानिक पोलीस स्टेशन व पंचांचे मदतीने नगर सोलापुर रोडने जावुन रुईछत्तीशी शिवारातील हॉटेल सुयोग समोर सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला पथकाची खात्री होताच टेम्पो चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने ताब्यातील आयशर टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी टेम्पोमध्ये दोन इसम बसलेले दिसले.त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) दिपनकर परेश देबनाथ,वय 30 व 2) आल्लुदिन जायनाल रपतान वय 36, दोन्ही रा. बिथारी नॉर्थ 24,परगनस, राज्य पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले.त्यांना टेम्पोमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस करता त्यांनी टेम्पोमध्ये मांगुर जातीचा जिवंत मासा असुन तो सोलापुर येथील शेततळ्यातुन काढुन टेम्पोमध्ये भरुन मध्यप्रदेश येथील इंदौर येथे घेवुन जात असले बाबत माहिती दिल्याने दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले व सहाय्यक मत्सविकास अधिकारी, अहमदनगर यांना संपर्क करुन ताब्यातील माश्याबाबत अभिप्राय देणे विषयी कळविले.त्यांनी लागलीच घटना ठिकाणी येवुन टेम्पोमधील माश्याची पाहणी करुन सदर मासा हा मांगुर जातीचा असुन नमुद मांगुन जातीचे माश्यापासुन भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका असुन मत्सपालन,विक्री व वाहतुकीस बंदी आहे असा अभिप्राय दिला व एक मांगुर जातीचा मासा पुढील तपासणी करीता सॅम्पल म्हणुन काढुन घेतल्याने दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 8,25,000/- रुपये किंमतीचा 5,500 किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा व 20,00,000/- रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो असा एकुण 28,25,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन दोन्ही आरोपी विरुध्द पोना/1372 संतोष शंकर लोढे,ने.स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 885/2022 भादविक 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अजित पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी,नगर ग्रामिण विभाग,श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/दिनकर मुंडे,सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे,दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे,पोकॉ/रोहित मिसाळ,मपोना/भाग्यश्री भिटे,सारीका दरेकर व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी केली आहे.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
