आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने १ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२९.डिसेंबर):-आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे नगर शहरातील पाईपलाईनरोड गावडे मळा येथील ज्ञान क्षेत्रात नवीन वर्षानिमित्त १ जानेवारी 2023 रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० वा.पर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.रक्तदाना मुळे माणसाचा जीव वाचू शकतो तसेच रक्तदान म्हणजेच जनसामान्यांची सेवा आहे,हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे तरी परिसरातील व शहरातील नागरिकांनी रक्तदानासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने करण्यात आले आहे.