अहमदनगर (दि.३० डिसेंबर):-शनिवार दि.30 डिसेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
पाईपलाईन रोड येथील यशोदानगर येथे नाथ किराणा स्टोअर्स नाव असलेल्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर नितीन सापते हा महाराष्ट्र शासनाने विक्रीस प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांज्याची चोरुन विक्री करत आहे.अशी खात्रीशीर गोपनिय बातमी मिळाल्याने पोनि/साळवे यांनी एक पथक तयार केले व सदर ठिकाणी जाऊन खात्री करून छापा टाकण्यास सांगितले.पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी एकुण 73,700/- रु.किं.च्या विविध रंगाच्या 96 नायलॉन मांज्याच्या रिळी जप्त केल्या.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नागरिकांना आव्हान
नागरिकांनी नायलॉन मांज्याचा वापर करु नये त्यामुळे मानवी जिवितास तसेच पक्षांना,प्राण्यांना तिव्र इजा होण्याची दाट शक्यात आहे.तसेच अशा प्रकारच्या मांजाचा वापर केल्यामुळे गंभीर स्वरुपाचा अपघात घडुन मानवी जिवितास हानी पोहचु शकते त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करु नये.तसेच कोठे नायलॉन मांज्याची विक्री होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अनिल कातकडे,तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/सचिन रणशेवरे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाठ,अहमद इनामदार,संदिप धामणे,वसिम पठाण,पोकॉ/ सतिष त्रिभुवन यांनी केली आहे.