दोन महिन्यात हरवलेले व चोरी गेलेले ४ लाख ५२ हजारांचे मोबाईल पाथर्डी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हस्तगत करून मूळ मालकांना केले परत
पाथर्डी प्रतिनिधी (दि.३० डिसेंबर):-गुन्ह्यांचे तपास असो वा सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम,यात पाथर्डी पोलिसांनी आपल्या कर्तृत्वातुन नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
असे असतानाच तब्बल ४ लाख ५२ हजारांचे रकमेचे मोबाईल मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे.पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी गेलेले आणि हरवलेले तब्बल ४ लाख ५२ हजारांचे एकूण २७ मोबाईल, मालकांना परत केला आहे.यावेळी नागरिकांनी समक्ष भेटून पाथर्डी पोलिसांचे विशेष आभार मानले.
यांना मिळाले मोबाईल परत
1)भानुदास निकरड पाथर्डी 2)भरत विठोबा तुपे माळी बाबळगाव 3)बंडू शहादेव ढाकणे चुंबळी4)किशोर बाजीराव बोंगाणे राहणार कुतरवाडी तालुका पाथर्डी5)ज्ञानेश्वर किसन बोंगाणे राहणार शिंगवे केशव तालुका पाथर्डी 6)विलग पोपट भगिनात कोनोशी तालुका शेवगाव7)नंदकुमार प्रभाकर जोशी राहणार तिसगाव 8)आदिनाथ बाजीराव राजळे राहणार कासार पिंपळगाव 9)योगेश बाबासाहेब बडे राहणार येळी 10)लक्ष्मण दशरथ रुपनर राहणार रुपनरवाडी 11) संदीप रामराव गीते राहणार चिंचपूर 12)नामदेव गोपीनाथ बडे राहणार भिलवडे,13) जगदीश विष्णुपंत वनारसे राहणार भालगाव,14)बापू रंगनाथ टेकाळे राहणार टाकळीमानुर,15)कृष्णा विष्णू ढाकणे राहणार ढाकणवाडी,16)गणेश बबन खेडकर राहणार चिंचपूर 17) शरद गोपीनाथ शिरसागर राहणार आगास खांड, 18)अनंत जगन्नाथ खेडकर राहणार भालगाव,19)गणेश बबन खेडकर राहणार चिंचपूर 20)नामदेव दिनकर पालवे राहणार बडेवाडी,21)दादासाहेब महादेव बारगजे राहणार मानेवाडी,22)प्रमोद सुरेश मोरे राहणार तनपुर वाडी,23)विलास अंबादास कुऱ्हाडे राहणार तलवाडा,24)शिवराव फुलसिंग पवार राहणार साकेगाव,25)ज्ञानेश्वर तुळशीराम आठरे राहणार केळवंडी, 26)रोहिदास महादेव बापसे राहणार मांडवे, 27)दत्तात्रय सखाराम मरकड राहणार निवडुंगे
पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे की बाजार करताना गर्दीचे ठिकाणी आपले मोबाईल वरील खिशात ठेवू नये तसेच चोरी झाल्यास किंवा हरवल्यास काय कार्यपद्धती कारवाई करावी याबाबत मार्गदर्शन केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोना/राम सोनवणे, दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडू,पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली आहे.