व्यंकटेश मल्टीस्टेटला सलग दुसऱ्यांदा बँको ब्लू रिबन २०२३ पुरस्कार जाहीर
अहमदनगर (दि.३० डिसेंबर):-आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेतलेल्या व्यंकटेश मल्टीस्टेट ने या दहा वर्षाच्या वाटचालीत अनेक माईलस्टोन गाठण्याची कामगिरी केली.
संस्थेची दशकपूर्तीही एक विश्वासाची दशकपूर्ती आहे या दहा वर्षात व्यंकटेश मल्टीस्टेटने ग्राहकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांचा विश्वास जोपासून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना जोडले आहे. त्याच प्रमाणे व्यंकटेश मल्टीस्टेट आर्थिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यात पण त्याच पुढाकाराने काम करत आहे.
देशी गाईंची गोशाळा,विद्यार्थी गौरव,शेतकरी मार्गदर्शन, महिलासबलीकरण,आरोग्य सुविधा,अन्नछत्रालय अशा विविध घटकांपर्यंत पोहोचेल असे कौतुकास्पद काम प्रामाणिकपणे करत आहे.
त्यामुळे आज व्यंकटेश मल्टीस्टेटला पुन्हा एकदा “बँको ब्लू रिबन २०२३” चा “सर्वोत्कृष्ठ सहकारी संस्था” या पुरस्काराने सन्मानित करणार आहे.या पुरस्कारचे सर्व श्रेय मल्टीस्टेटच्या सर्व खातेदार,कर्जदार,ठेवीदार,कर्मचारी यांना देत आहोत.यावेळी व्यंकटेश मल्टीस्टेटचे अनिल गुंजाळ हे म्हणाले की सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवत पुन्हा कौतुकाची थाप मिळायला आम्हास पात्र केले.