अहमदनगर (दि.२९ डिसेंबर):-सावेडी उपनगरातील पारिजात चौकातील तांबटकर मळ्यामध्ये आगाऊ घेतलेले पैसे देण्याच्या वादातून कमलेश प्रेमकुमार कुशवह या परप्रांतीय व्यक्तीचा खून केल्याची घटना उघडकीस आली.
या संदर्भात मिठाना कमलेश कुशवह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिंदाप्रसाद कालीदिन रावत याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात कलम 302,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की २८/१२/२०२३ रोजी १०.३० वाजे सुमा तांबटकर मळा, परीजात चौक गुलमोर रोड अहमदनगर येथे मी राहत असलेले घरात माझा भाऊ नामे राजु याचे सोबत फोनवर बोलत असताना बिंदाप्रसाद कालीदीन रावत हा तेथे येवुन मोठ्याने बोलु लागला म्हणुन त्यास माझे पती कमलेश हे त्यास मोठ्याने बोलु नको असे म्हणाले तसेच आमचे आगावु घेतलेले पैसे दे असे म्हणाल्याचा राग आल्याने बिंदाप्रसाद कालीदीन रावत याने माझे पती नामे कमलेश प्रेमकुमार कुशावह यांना चाकुने छातीवर मारहाण करुन जखमी करुन त्यास जिवे ठार मारले असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली.
फिर्याद दाखल केल्यानंतर तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपी बिंदाप्रसाद रावत यास काही तासातच जेरबंद केले.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे मर्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि.जे.सी.मुजावर,पोसई/ सचिन रणशेवरे,पोहेकॉ/सुनिल शिरसाठ,पोहेकॉ/प्रदिप बडे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोना/संदिप धामने, पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/ अतुल कोतकर,पोकॉ/सतिष त्रिभुवन यांनी केली आहे.