मावळ तालुकास्तरीय भव्य शिक्षक क्रिकेट स्पर्धा चषक लोहगड लायन्स संघ विजयी
पुणे प्रतिनिधी (दि.३० डिसेंबर):-पुणे जिल्ह्यातील मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आणि पंचायत समिती मावळ यांच्या सहकार्याने आयोजित मावळ चषक क्रिकेट स्पर्धा आज ३० डिसेंबर २०२३ रोजी जांभूळ तालुका मावळ येथील VDR स्टेडियम जांभूळ मावळ येथे यशस्वीपणे पार पडल्या.
या स्पर्धेत मावळ तालुक्यातील सहा बिटातील सहा संघांचा समावेश होता.लोहगड लायन्स,तुंग टायटन्स,भंडारा ब्रेवर्स,विसापूर वॉरियर्स, राजमाची रॉयल्स,तिकोना टायटन्स या सहा संघांनी सहभाग घेतला होता.
यात अटीतटीच्या लढतीत लोहगड लायन्स हा संघ विजयी झाला.आयोजकांनी विजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.