तरुणांनो आता सावधान..! नववर्षाच्या सुरुवातीस हुल्लडबाजी केल्यास होणार कारवाई;कोतवाली पोलिसांनी हाती घेतली मोहीम
अहमदनगर (दि.३१ डिसेंबर):-सरत्या वर्षाला निरोप देताना तरुणाईकडून वेगळाच जल्लोष केला जातो.
त्याला भर पडते ती अवैध आणि चुकीच्या गोष्टींची.रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन हुल्लडबाजी केली जाते, दारू पिऊन रात्री अपरात्री वाहने चालवली जातात. त्यामुळे स्वतःसह अनेकांचा जीव धोक्यात घातला जरी, त्रास सहन करावा लागतो.याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२९ पासून दंगा मस्ती करत ट्रिपल सीट फिरणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना क्रमांकाची वाहने, पुणे बस स्थानक माळीवाडा बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात संशयित रित्या फिरणे- दंगा करणे तसेच चालक परवाने नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलचालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. ‘नववर्षाचे स्वागत करण्याबाबत हरकत नाही मात्र दारू पिऊन हुल्लडबाजी करणे दारू पिऊन अस्ताव्यस्त वाहने चालवणे अशा टवाळखोरांवर कारवाई करणार असल्याच्या सूचना यादव यांनी दिल्या आहेत.
अशा प्रकारांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. दि.२९ पासून सुरु केलेली ही मोहीम दि.३१ चे रात्री सुद्धा ही मोहीम सुरु राहणार आहे. आत्तापर्यंत १६ वाहने आणि 11 युवकांवर कारवाई केली आहे. या तीन दिवसाच्या कालावधीत रस्त्यावरील वाहनांवर आणि तरुणाईवर कोतवाली पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पिंगळे गजेंद्र इंगळे अश्विनी मोरे विश्वास भानसी पोलिस जवान विशाल कुलकर्णी अनुप झाडबुके सतीश भांड विजय कोतकर प्रशांत बोरुडे गुलाब शेख विजय काळे आणि गुन्हे शोध पथकाचे जवान आदी करत आहेत.