Maharashtra247

कोतवाली पोलिसांची पुन्हा एकदा मोठी कारवाई ८ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर (दि.१ जानेवारी):-दोन दिवसांपूर्वीच नगरमधल्या दोन ठिकाणी छापा टाकून गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.आता पुन्हा एकदा दि.३१ डिसेंबर रोजी पहाटे ३ च्या दरम्यान कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.शहरातील कारी मस्जिद सार्वजनिक सौचालयाच्या जवळ अर्धवट बंद खोलीत ५ लाख ६० हजार किमतीचे गोमांस जप्त करत औवेस राशीद शेख (वय २४) रा.आंबेडकर चौक झेंडीगेट अहमदनगर,शोएब अब्दुल रउफ कुरेशी (वय २८) रा.कारी मशिदजवळ बाबा बंगाली अहमदनगर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

तर एका इमारतीच्या तळ मजल्यावर १ लाख ६५ हजार किमतीची ११ गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्या प्रकरणी जाहिद रउफ सय्यद (वय २३)रा.बारा इमाम कोठला अहमदनगर यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असा एकूण ७ लाख २५ हजार रकमेचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

या आरोपींवर भादवि.कलम २६९ महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (क) ९ (अ) सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे पोकॉ/अभय कदम यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाप्रकारे ३ दिवसांत जिवंत जनावरे आणि गोमांस असा १२ लाख ८५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकूण ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,पोलीस जवान तनवीर शेख,गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,संदिप थोरात, सोमनाथ राऊत,अमोल गाढे,रियाज इनामदार,सुजय हिवाळे,सलिम शेख,अतुल काजळे,अभय कदम,यांच्या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page