Maharashtra247

ओळखीचा फायदा घेत मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर केला अतिप्रसंग कोतवालीत गुन्हा दाखल

अहमदनगर (दि.१ जानेवारी):-ओळखीचा फायदा घेत मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अतिप्रसंग केल्याची घटना गुरूवारी (दि. २८ डिसेंबर) रोजी दुपारी घडली आहे.

याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने शनिवारी (दि.३० डिसेंबर) रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अमीर हसन शेख (रा. शिक्रापूर ता.शिरूर,जि.पुणे) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादीची अमीर शेख सोबत ओळख होती.या ओळखीतून त्याने फिर्यादीला २००८-०९ मध्ये प्रेमासाठी प्रपोज केला होता.फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला होता.

फिर्यादीचा २०१० मध्ये विवाह झाला.त्यानंतर २०२२ पर्यंत अमीर शेख हा फिर्यादीच्या संपर्कात नव्हता. ऑक्टोबर २०२२ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अमीर व फिर्यादी दोघे संपर्कात आले.त्यांच्यात फोनवर बोलणे देखील होत होते. अमीरने फिर्यादीला बुधवारी (दि.२७) फोन करून गुरूवारी (दि. २८) दुपारी नगर शहरातील पुणे बसस्थानक येथे भेटण्याठी बोलावले होते.

फिर्यादी त्यांच्या अल्पवयीन (वय ६) मुलाला घेऊन गुरूवारी दुपारी पुणे बस स्थानकावर गेल्या.तेथे अमीर आला व त्यांनी एकत्रित चहा घेतला.गप्पा मारल्या अन पीडित महिलेला आरोपी जा एका लॉजवर घेऊन गेला ही महिला बाथरूम मध्ये गेल्यानंतर तिच्याकडे त्याने शरीरसंबंधाची मागणी केली. त्यावेळी तिने नकार दिला.

मात्र त्यानंतर अमीर याने फिर्यादीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अति प्रसंग केला,त्यावेळी महिला तेथून निघून गेली अन हा प्रकार पतीला सांगितला. त्यामुळे पतीसह पिडीतेने कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.पोलीस अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page