चिंचोली गुरव येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत नागरिकांनमध्ये असणाऱ्या शंका दूर करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून जनजागृती मोहीम
संगमनेर (राजेंद्र मेढे):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील अतिशय महत्त्वाची अशी समजली जाणारी चिंचोली गुरव ग्रामपंचायत येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत मतदारांना असलेल्या शंका दूर करण्यासाठी आज १ जानेवारी २०२४ रोजी संगमनेर तहसील कार्यालयाकडून जनजागृती अभियान राबविण्यात आले.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे.या यंत्रांबाबत नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी संगमनेर तहसील निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत येथील चिंचोली गुरव येथे जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यामार्फत या यंत्राचे प्रात्यक्षिक करून नागरिकांच्या शंका दूर केल्या.यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला व उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी चिंचोली गुरवचे तलाठी अमोल गडाख यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले.