पदमशाली समाजाच्या अध्यक्षपदी श्रीनिवास बोज्जा यांची तर श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान अध्यक्षपदी गणेश विद्ये यांची बिनविरोध निवड
अहमदनगर (दि.१ जानेवारी):-नुकतीच पदमशाली समाजाच्या सभासदांची बैठक झाली व या बैठकीत घटनेप्रमाणे एकूण 50 विश्वस्थाची निवड करण्यात आली.
व या मधून पंचकमेटी पदमशाली ज्ञाती समाज नों. क्रमांक ए -41 व श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान, नों. क्रमांक – ए -23 यांच्या विश्वस्त व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती पदमशाली समाजाचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश येनगंदुल यांनी माहिती दिली.सदर बैठक समाजातील जेष्ठ विश्वस्त प्रकाश येनगंदुल यांच्या अध्यक्षतेखाली निवड झालेल्या 50 विश्वस्त म्हणून बोज्जा श्रीनिवास,येनगंदुल त्रिलेश,अमित बुरा, रवी दंडी, तिरमलेश पासकंठी अनमल रितेश, सुंकी शुभम, शरद मडूर, श्रीनिवास बुरगूल, गिरीश चिट्टा,अमित बिल्ला, म्याना विनोद, लक्ष्मीकांत नल्ला पंतलू , डॉक्टर गणेश श्रीगादी, इंजि.सतीश पागा, एल्लाराम श्रीनिवास सर , शंकर जिंदम, विनायक बोगा, विद्ये गणेश, अरकल अभिजीत, जोग दत्तात्रेय, अभिजीत चिप्पा, ज्ञानेश्वर मंगलारम पंतलू, वाय प्रकाश येनगंदूल, जेष्ठ सदस्य अंजय्या यंगल, कुमार आडेप, लयचेट्टी राजेश, यंगल अंजय्या, महेश रच्चा, संजय बाले, नारायण मंगलाराम सर , दत्तात्रय रासकोंडा, विनायक बत्तीन, सागर सब्बन, इगे राजेंद्र, बुरा पुरुषोत्तम, वंगारी श्रीनिवास, संजय वल्लाकट्टी, सब्बन पुरुषोत्तम, अनमल प्रणित, येनगुपटला धनंजय, गणेश चेन्नूर, विलास दिकोंडा, इंजि. गणेश क्यातम, इंजि.अजय गुरुड, अंबादास गोटीपामुल , अमोल गाजेंगी, बालाजी गोणे, एडव्होकेट राजु गाली, दत्त्तात्रय जोग या विश्वस्ता मधून पंचकमेटी पदमशाली ज्ञाती समाजाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा,उपाध्यक्ष पदी उद्योजक त्रिलेश येनगंदुल, सचिव पदी अमित बुरा सह सचिव पदी रवी दंडी व खजिनदार पदी तिरमलेश पासकंटी यांची एकमताने बिनविरोध निवड केली.
या नंतर समाजातील घटने प्रमाणे पंचकमेटी पदमशाली ज्ञाती समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानच्या अध्यक्ष पदी गणेश विद्ये, उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर मंगलारप, सचिव पदी सतीश पागा, सहसचिव पदी विनायक बोगा व खजिनदार पदी प्रणित अनमल यांची व कार्यकारणी सदस्य म्हणून गिरीश चिट्टा,अंजय्या यंगल, अभिजित अरकल, शरद मडूर, महेश रच्चा, विनोद म्याना आदिची निवड केली.
यावेळी नवनिर्वाचित दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून इतर विशवस्थानी शुभेच्छा दिल्यात. या नंतर समाजातील एकमेव श्री मार्कडेय मंदिर जीर्णोद्धार बाबत चर्चा होऊन मंदिराचे सभा मंडपाचे काम लवकरच सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले.
या वेळी पद्मशाली समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, माझी निवड केल्यामुळे मी सर्व विश्वस्त व अखंड पदमशाली समाजाचे आभार मानतो व या पुढे समाजातील छोटया घटकापासून सर्व समाज बांधवांच्या सामाजिक व आर्थिक विकास होण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच श्री मार्कंडेय देवस्थान कमिटी चे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश विद्ये यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, श्री मार्कंडेय मंदिराला 100 वर्षे पूर्ण झाले असून या मंदिराचे जीर्णोद्धार व सभा मंडपाचे बांधकाम करणे हाच माझा उद्देश असून हे काम मी माझ्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा माझा मानस असून त्यासाठी सर्व विश्वस्त व संपूर्ण पदमशाली समाजाने मला सहकार्य करावे असे आवाहन केले.शेवटी उपस्थित सर्व विश्वस्थाचे आभार संस्थेचे नवनिर्वाचित सचिव अमित बुरा यांनी मानले.