अहमदनगर (दि.३ जानेवारी):-एमआयडीसी परिसरात सख्ख्या बहीणीच्याच घरी घरफोडी करणाऱ्या भावास 16,18,900/- रुपये किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सुजय सुनिल गांधी (व्यवसाय किराणा दुकान,रा. माताजी नगर,जिमखाना, एम.आय.डी.सी.ता.जि. अहमदनगर) हे दि. 30 डिसेंबर 2023 रोजी रात्री 08.00 वा.चे सुमारास त्यांचे नातेवाईकाचे लग्न समारंभाचे कार्यक्रमाकरिता बुरुडगांव रोड या ठिकाणी गेले व रात्री 11.00 वा. चे सुमारास परत घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे बंद घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन 2,50,000/- रुपये रोख रक्कम व 4,80,000/- रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने,3000/- रुपये किमतीची लोखंडी तिजोरी असा एकुण 7,33,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला होता.
या घटनेबाबत एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 1196/2023 भादविक 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.अहमदनगर शहरामध्ये बंद घराचे घरफोडीच्या नेहमी घटना घटत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
स्थागुशा चे वरील पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता फिर्यादीचे घरासमोर एक इसम मोपेड गाडीवरुन आल्याचे दिसुन आले.पोलीस पथक गुप्त बातमीदारामार्फत तसेच अहमदनगर शहरातील पतसंस्था,गोल्ड लोन देणारे व्यवसायीक,फायनान्स कंपनी यांचे कडे गहाण ठेवलेल्या सोन्याची माहिती घेत असतांना पोनि.श्री दिनेश आहेर यांना फिर्यादीचा मेव्हणा सुरज प्रकाश लोढा याने मुथुट फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक सुरज लोढा याची माहिती घेत असतांना त्याच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने पोलीस पथकाने दि.03 जानेवारी 2024 रोजी सुरज प्रकाश लोढा (रा.सावली सोसायटी, भुषणनगर,अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.ताब्यात घेण्यात आलेला आरोपी कडुन त्याने चोरी केलेले 13,26,400/- रुपये किमतीचे 221 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2,04,500/- रुपये रोख रक्कम, तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेले 16,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल, 70,000/- रुपये किमतीची मोटारसायकल, 2000/- रुपये किमतीचे तिजोरी कापण्यासाठी वापरलेले ग्राइंडर असा एकुण 16,18,900/- रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला आहे.
तसेच त्याने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 04 सोन्याच्या बांगड्या मुथुट फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवले असल्याची कबुली दिली आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासकामी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हे करीत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे व श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव,पोहेकॉ/संदीप पवार,पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से,विजय ठोंबरे, सचिन अडबल,संतोष लोढे, संतोष खैरे,पोकॉ/रविंद्र घुंगासे,सागर ससाणे,अमृत आढाव,आकाश काळे,प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे, व चापोकॉ/अरुण मोरे यांनी केलेली आहे.