हरवलेले व चोरी गेलेले ११ लाख ३५ हजारांचे ४० विविध कंपनीचे महागडे मोबाईल तोफखाना पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हस्तगत करुन मुळ मालकांना केले परत
अहमदनगर (दि.३ जानेवारी):-हरवलेले व चोरी गेलेले 11 लाख 35 हजारांचे 40 विविध कंपनीचे मोबाईल तोफखाना पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हस्तगत करुन मुळ मालकांना परत केले आहे.
अन्न,वस्त्र,निवारा या मुलभुत गरजे प्रमाणेच सध्याच्या काळात मोबाईल हि प्रत्येक नागरिकांची मुलभुत गरज झालेली आहे.त्यातुनच गुन्ह्याचा तपास असो वा सामाजिक बांधिलकी जपणारे तपास याविविध उपक्रमाने तोफखाना पोलीसांनी आपल्या कर्तृत्वातुन नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
असे असतानाच तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणाहून नागरिकांचे चोरी गेलेले व हवलेले तब्बल 11 लाख 35 हजार रु.किं.चे 40 विविध कंपनीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करुन त्यांच्या मुळ मालकांना तोफखाना पो.नि.मधुकर साळवे यांनी आज गुरवार दि.३ जानेवारी रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे परत केले आहे.त्यामुळे नागरिकांनी पो.नि.मधुकर साळवे यांना समक्ष भेटुन त्यांच्या कामाचे कौतुक करुन तोफखाना पोलीस स्टेशनचे विशेष आभार मानले.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.हरिष खेडकर,तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पो.उप.नि/ सचिन रणशेवरे,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोना/दिनेश मोरे,पोना/भानुदास खेडकर,पोकॉ/सुमित गवळी , दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/ नितिन शिंदे यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नागरिकांना आवाहन
नागरिकांनी गर्दिच्या ठिकाणी किवा बाजार करताना आपले मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवु नये. रस्त्यावर सापडलेला मोबाईल किवा चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये. तसेच मोबाईल हरवल्यास किवा चोरी गेल्यास तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे.