अहमदनगर (दि.४ जानेवारी):-शेवगाव तालुक्यातील मुंगी व हादगाव या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून शासकीय वाळूची चोरून वाहतूक करणाऱ्या एक डंपर व एक ट्रॅक्टर वर कारवाई करत वाळूसह १५,६०,००० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शेवगांव पोस्टे हददीत अवैध वाळु वाहतुकी.बाबत गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,त्रिंबक रक्टे हा त्याच्या हस्तकामार्फत एमएच-१६ बी वाय-६१५९ क्रमांक असलेल्या लाल रंगाच्या स्वराज ट्रैक्टर व लाल रंगाच्या दृचाकी ढपींग ट्रॉलोमधून मूंगी ता.शेवगांव, जि.अ.नगर येथे शासकिय वाळु चोरुन वाहतुक करत आहे.
आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर रोडच्या कडेला थांबवायला लावला व ट्रैक्टर चालकास वाळू वाहतूक करण्याचा परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने परवाना नसलेबाबत कळविले नमूद ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) शत्रुघ्न रोहीदास मोटगर (रा. मुंगी ता.शेवगांव जि.अहमदनगर) असे असल्याचे सांगितले सदर ट्रैक्टर चालकास ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर ट्रॅक्टरचा मालक २) त्रिंबक रक्टे रा. मुंगी ता. शेवगांव (पूर्ण नाव माहिती नाही) (फरार) हा असून त्याचे सांगणेवरून त्याचे आर्थीक फायद्याकरीता शासकीय वाळू चोहनीलाकांत (पूर्ण नाव.माहतुको सदर ट्रॅक्टरवरील चालक मालक यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे शासकिय वाळु चोरुन वाहतूक करताना मिळुन आले आहे.
तसेच दुसरी कारवाई शेवगाव तालुक्यातील हादगाव ते बोधेगाव या रोडने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जात असताना रोडला एक डंपर दिसला त्या ढंपर चालकास ढंपर रोडच्या कडेला बॅटरीच्या सहाय्याने हाताने थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने ढंपर रोडच्या कडेला थांबविला नमूद डंपर चालकास वाळू बाहतूक करण्याचा परवान्याचाबत विचारपूस केली असता त्याने कोणताही परवाना नसलेबाबत कळविले नमूद ढपर चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) कृष्णा दिनकर कुत्तरवाडे (रा. आगसखांड) डंपर चालकास ढंपर कोणाच्या मालकीचा आहे याबाबत विचारपूस केली असता मालक २) भैय्या बोरुडे रा.तिसगाव जि. अहमदनगर (पूर्ण नाव माहिती नई) फरार) सांगणेवरून त्याचे आर्थिक फायद्याकरीता शासकीय वाळू चोरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले.सदर इंपरवरील चालक-मालक यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे शासकिय वाळु चोरुन वाहतूक करतांना मिळुन आले आहे.वरील चालक मालक यांचे विरुध्द भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पोकॉ/शिवाजी ढाकणे,संतोष शंकर लोंढे,किशोर शिरसाट यांनी केली आहे.