
अहमदनगर (दि.४ जानेवारी):-अहमदनगर शहरामध्ये UNDER ARMOUR कंपनीचे बनावट कपडे विक्री करणारे दोन आरोपी 3 लाख 18,400/- रुपये किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
दि. 03/ जानेवारी 2024 रोजी नेत्रीका कन्सल्टींग ऍ़ण्ड इन्व्हेस्टीगेशन इंडिया प्रा.लि. या खाजगी कंपनीतील सिनीअर फिल्ड एक्झिक्युटीव्ह दिपक बाबुलाल पटेल (रा.डी. 5/11,अस्मिता ज्योती सोसायटी,मारवे रोड, मालाड प.मुंबई) यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांना समक्ष भेटुन नगर शहरातील बालीकाश्रम रोडवरील श्री स्पोर्ट व शिव स्पोर्ट या दुकानामध्ये UNDER ARMOUR कंपनीचे नावाचा वापर करुन बनावट कपडे विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती दिली.
या बातमीचे आधारे श्री. राकेश ओला यांनी प्राप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच नेत्रीका कन्सल्टींग ऍ़ण्ड इन्व्हेस्टीगेशन इंडिया प्रा.लि. कंपनीचे तज्ञ अधिकारी व पंचाना सोबत घेवुन बालीकाश्रम रोडवरील श्री स्पोर्ट व शिव स्पोर्ट या दुकानामध्ये जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.पोलीस पथकाने बालीकाश्रम रोडवरील शिव स्पोर्ट या दुकानामध्ये जावुन पाहणी करता दुकानामध्ये इसम नामे शाहरुख ईस्माईल शेख (रा. मंगलगेट,ता.जि.अहमदनगर) हा मिळुन आला.सदर इसमास त्याचे दुकानाचे झडतीचा उद्देश समजावुन सांगुन कंपनीचे तज्ञ अधिकारी यांनी पंचासमक्ष तपासणी करता सदर दुकानामध्ये 1,29,600/- रुपये किमतीच्या UNDER ARMOUR कंपनीचे चिन्ह व टँग असलेल्या बनावट ट्रॅक पँट,व 75,600/- रुपये किमतीचे टी शर्ट असा एकुण 2,05,200/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
तसेच बालीकाश्रम रोडवरील श्री स्पोर्ट दुकानामध्ये जावुन पाहणी केली असता दुकानामध्ये इसम नामे सतिष अशोक सायंबर (रा.कायनेटीक चौक,केडगांव,ता.जि. अहमदनगर) हा मिळुन आला.सदर इसमास त्याचे दुकानाचे झडतीचा उद्देश समजावुन सांगुन कंपनीचे तज्ञ अधिकारी यांनी पंचासमक्ष तपासणी करता सदर दुकानामध्ये 1) 60,000/- रुपये किमतीचे UNDER ARMOUR कंपनीचे चिन्ह व टँग असलेले बनावट जॅकेट, 2) 25,200/- रुपये किमतीचे टी शर्ट, व 3) 28,000/- रुपये किमतीच्या ट्रॅक पँट असा एकुण 1,13,200/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.दोन्ही दुकानात मिळून 3 लाख 18 हजार 400/- रुपये किमतीचा मुद्देमाल विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द नेत्रीका कन्सल्टींग ऍ़ण्ड इन्व्हेस्टीगेशन इंडिया प्रा.लि. कंपनीचे सिनीअर फिल्ड एक्झिक्युटीव्ह श्री.दिपक बाबुलाल पटेल (व्यवसाय – नोकरी रा.डी. 5/11,अस्मिता ज्योती सोसायटी,मारवे रोड, मालाड प.मुंबई) यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशनला भादवि कलम 420 सह कॉपीराईट का.क.51 व 63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे.
हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.हरिष खेडकर पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय,अति.कार्यभार नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/संदीप पवार,सचिन अडबल,पोना/संतोष खैरे,पोकॉ/अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे यांनी केलेली आहे.