जिल्हाधिकाऱ्यांच्या महाराजस्व अभियानाची तहसीलदारांनी जनजागृती करून अंमलबजावणी करावी;शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यासाठी शेतीचा बांध ते मंत्रालयाचे दार सोडणार नाही-सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे
पारनेर प्रतिनिधी (दि.४ जानेवारी):-अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशानुसार पारनेर तहसील कार्यालयाने महाराजस्व अभियान शासन मा.शासन निर्णय क्र.मराअ-२०२३ /प्र. क्र.१९/म-५,दि ०१ डिसेंबर २०२३ ची जनजागृती,अंमलबजावणी करुन तालुक्यातील शेत रस्ता व शिवपानंद रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत.
तसेच पारनेर तालुक्यात अनेक शेत रस्ता व शिवपानंद रस्ता केसेस प्रलंबित असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी हलाकीची परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये दि.२३/१२/२०२३ ते २३/०१/२०२४ दरम्यान शेतरस्ते खुले करण्यासंदर्भात शेतकाऱ्यांसाठी विशेष मोहीम राबण्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर करत परिपत्रक काढले असून,भुमी अभिलेख यांनी नमूद रस्त्याबाबत मोजणी फी आकारू नये अश्या सूचना परिपत्रकात नमूद केले आहेत.
त्या अनुषंगाने पारनेर तालुक्यात महाराजस्व अभियान शासन मा.शासन निर्णय क्र.मराअ-२०२३ /प्र. क्र.१९/म-५,दि ०१ डिसेंबर २०२३ ची जनजागृती,अंमलबजावणी होताना कुठेही आढळून आले नाही तरी तालुक्या शेतरस्त्यांच्या अभावी फौजदारी स्वरूपांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याच बरोबर दि ०७/०१/२०२४ ते १०/०१/२०२४ दरम्यान रस्ता अदालत घेण्याचे परिपत्रकात सूचित करण्यात आले तरी या अभियानाची अंमलबजावणी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत शेतकऱ्यांना न्याय दयावा.
जिल्हाधिका-यांनी पेरू वाटप आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना न्याय देणारी विशेष मोहीम राज्याला दिशा दर्शक असुन ही मोहीम शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची आहे.त्याची जिल्हयात जनजागृती होताना दिसत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी शेतकरी पारनेर तहसीलवर बहुसंख्येन उपस्थित होते प्रत्येक तहसीलवर शेतकरी रस्ता अदालतसह,झिरो शेतरस्ता पेंडसी,ग्रामशेतरस्ता समित्यांच्या मागण्यांसह महाराजस्व अभियानाची जनजागृती,अंमलबजावनी तहसीलवर करण्यासाठी पारनेर तहसीलवर सुरुवात झाली आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने शेतरस्ता अर्ज तहसीलकडे जमा केले आहेत यावेळी शरद पवळे,ॲड.अजिंक्य गवळी, दशरथ वाळूंज, भाऊसाहेब वाळूंज, सुभाष शेळके, सिताराम तरटे, संजय साबळे, विजया शेळके, गंगुबाई तरटे, पंढरीनाथ गाडगे, रामदास लोणकर, पोपट दिवटे, आबा लंके, नितिन पांढरकर, सोमनाथ फरांगडे, बाळू दिवटे, बन्सी ठुबे, ज्ञानदेव जगताप, भानुसास बनकर, विलास गायकवाड, गणेश मुसळे, स्वप्निल गट, रमेश बारकर इ.उपस्थित होते.