Maharashtra247

सीएनजी पंप देण्याचा बहाना करून ऑनलाईन पंधरा लाख रुपयांची फसवणूक झालेल्या इसमास सायबर पोलीस ठाण्याने कारवाई करत सात लाख रुपयांची रक्कम मिळून दिली परत

अहमदनगर (दि.४ जानेवारी):-CNG पंप देण्याचा बहाणा करून १५ लाख ४५ हजार ५००/-रू.ची. ऑनलाईन फसणूक केलेल्या रक्कमेपैकी ७ लाख १० हजार ३५७/-(सात लाख दहा हजार तीनशे सत्तावन्न रूपये) फिर्यादी यांना सायबर पोलीस स्टेशन कडून परत देण्यात आले.

यातील फिर्यादी अशिष गोविंद निलंगे रा.अहमदनगर यांना दिनांक ११/८/२०२३ ते दिनांक ७/९/२०२३ दरम्यान ९०३८८३६१५० मोबाईल नंबर धारक राजेश शुक्ला व ९०४६९२५३२३ सिध्दार्थ शुक्ला यांनी आदाणी कंपनीचे अधिकारी असल्याचे बतावणी करून CNG पंप देण्याचा बहाणा करून नमुद विविध बँकेचे खात्यात वेळोवेळी पैसे भरण्यास सांगून फिर्यादी यांची एकुण १५४५५००/- रू.(पंधरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे रूपये) रुपयाची फसवणुक केली आहे.या फिर्यादीवरून गुरंन २२/२०२३ भादवि १४९,४२० IT एक्ट ६६ (D) प्रमाणे गुन्हा रजि. दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या आदेशान्वये व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ फसवणूक झालेल्या व्यवहाराची माहिती घेवून ज्या खात्यात फसवणूक झालेली रक्कम वर्ग घाली आहे त्या बँकेशी संपर्क करून तात्काळ फसवणूक करणारे बँक खाते गोठविण्यास सांगितले.त्यामध्ये ७१०३५७/- गोठवण्यात यश आले.व त्यानंतर मा.न्यायालयाकडून फसवणूक झालेली रक्कम ७१०३५७/- ( सात लाख दहा हजार तीनशे सत्तावन्न रूपये) फिर्यादी यांना परत करण्याचे आदेश प्राप्त करून नमुद रक्कम फिर्यादी यांना परत करण्यात आली आहे.नागरीकांना अहवान करण्यात येते की,पेट्रोलपंप एजन्सी देतो,घर बसल्या जॉब देण्याचा बहाणा,ऑनलाईन KYC अपडेट करणे अशा आमिषाला बळी पडू नये प्रत्येत अनोळखी व्यक्तीशी आर्थीक व्यवहार करतांना काळजी घ्यावी.

तसेच कोणत्याही प्रकारे आर्थीक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टल हेल्प लाईन नंबर १९३० या नंबर वर तक्रार करावी.हि कामगिरी जिल्हा पोलिस श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांच्या सुचने नुसार सायबर पोलीस स्टेशनचे पोसई/श्री.राहुल सानप,पोहेकॉ/योगेश गोसावी,राहुल हुसळे,पोना/अभिजीत अरकल यांनी केली आहे.

You cannot copy content of this page