संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे दुर्दैवी घटना घडली आहे.नवरदेव लग्नासाठी धामधूम वरातीत निघाला असताना बेधुंद झालेल्या डीजे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अचानक वेग वाढल्याने वरातीतील १० ते १२ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे.
यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या मंगलमयी प्रसंगी गावावर शोककळा पसरली आहे.नवरदेवाची पाठवणी सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. डीजे चालकाने अचानक वेग वाढविल्याने वराती मंडळी चाकाखाली चिरडली गेली.
या अपघातात बाळासाहेब हरिभाऊ खताळ वय २५ रा.धांदरफळ खुर्द, भास्कर राघू खताळ वय ३७ रा. धांदरफळ खुर्द यांचा मृत्यू झाला आहे.तर रामनाथ दशरथ काळे,अभिजित संतोष ठोंबरे,सोनाली बाळासाहेब खताळ अशा संजय खताळ हे जखमी झाले आहेत.यामधील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.या घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.अधिक तपास पोलीस करीत आहे.