सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीकडून मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप
पुणे प्रतिनिधी (दि.५ जानेवारी):-‘बालिका दिन’ महाराष्ट्र शासन १९५५,३ जानेवारी २०२४ रोजी बालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो.
या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.महिला शिक्षण दिन म्हणून देखील हा दिवस साजरा होतो.महाराष्ट्र शासनाकडून १९५५ पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.त्यांनी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
बालिका दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टी तर्फे मुलींना शैक्षणिक साहित्य तसेच आलेल्या सर्व बालकांना चॉकलेट वाटपाचे कार्यक्रमाचे नियोजन केले होते.यावेळी पुणे शिक्षक आम आदमी आघाडीच्या शहराध्यक्षा सौ.शितल कांडेलकर यांनी माता सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सांगितला, सावित्रीबाई फुले यांनी या देशासाठी व तसेच महिला वर्गांसाठी जे महान कार्य केले त्याची माहिती दिली.यावेळी आघाडी शहर उपाध्यक्ष पूजा वाघमारे व आम आदमी पार्टीतील सर्व महिला पदाधिकारी शाळेतील लहान मुले व मुली यावेळी उपस्थित होते.