जिल्ह्यातील सर्व पांजरापोळ,गोशाळांमधील गोधन,पशुधन यांची चारा आणि पाणी टंचाई समस्या त्वरित सोडवावी इंजि.यश शहा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहमदनगर (दि.५ जानेवारी):-जिल्ह्यातील सर्वच पांजरपोळ तथा गोशाळा यांना दुष्काळी परिस्थितीमुळे गोधन,पशुधन चारा टंचाई, पाणी टंचाई या समस्या तीव्र स्वरूपात निर्माण झालेल्या आहे.
इंजि.यश प्रमोद शहा यांनी ऍनिमल वेल्फेअर बोर्ड,भारत सरकार मेंबर, गोसेवा आयोग तथा समस्त महाजन,आदि जैन ट्रस्ट अहमदनगर जिल्हा कॉर्डिनेटर या नात्याने जिल्ह्यातील गोशाळा तथा पांजरपोळ यांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यादरम्यान गोशाळा संचालकांनी आपले समस्यांचे निवेदन शहा यांना दिले.शहा यांनी निवेदनाची त्वरित दखल घेऊन गोसेवा आयोग महाराष्ट्राचे अध्यक्ष मुंदडा यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत फोनवर चर्चा केली व त्यांना या बाबतीत ईमेल केला.
ॲनिमल वेल्फेअर बोर्ड चे गिरीश शहा यांना याबाबत सांगितले.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना देखील ई-मेल केला आहे.शहा यांच्या मागणीची आयोगातर्फे त्वरित दखल घेऊन आयोगाचे सदस्य सूर्यवंशी यांनी आयोगच्या आदेशानुसार तसे पत्रक देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे जारी केले आहे.आयोगाचे पत्रक तसेच गोशाळांची विनंती पत्रक निवेदन एकत्रित सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर यश शहा यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना ईमेल करून तसेच फोनद्वारे माहिती दिली.
याबाबत सविस्तर चर्चासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व गोशाळा आणि पांजरापोळ यांची मीटिंग तात्काळ बोलवण्याचे विनंती केली जेणे करून या अडचणी तसेच इतर अडचणींबाबत सविस्तर चर्चा होऊन मार्ग निघेल व गोधनसाठी अहमदनगर जिल्ह्यात चांगले काम करता येईल.
संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या बाबत त्वरित तोडगा काढण्याचे आदेश पत्रक काढावे ही विनंती केली.जिल्हाधिकारी यांनी देखील सकारात्मक भूमिका घेत उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ मॅडम,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांना याबाबत कारवाई करण्याच्या सूचना केल्या.उपजिल्हाधिकारी मॅडम यांच्या आदेशानुसार त्वरित याबाबतचे पत्र व योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त अहमदनगर तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हापरिषद अहमदनगर यांना लेखी पत्त्राद्वारे दिले.गोसेवा आयोग यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांची त्वरित दखल घेतल्याबाबत यश शहा यांनी समाधान व्यक्त केले.