Maharashtra247

ब्रदर राहुल वैराळ यांना २०२४ चा गौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर (दि.५ जानेवारी):-युवा ख्रिस्ती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ब्रदर राहूल वैराळ यांच्या मार्फत संपूर्ण डिसेंबर महिन्यात नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने पवित्र बायबल मधील वचन याकोब 1,27 प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक चर्चमध्ये जाऊन अनाथ तसेच विधवा महिलांना एक हजार साड्याचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक कार्याची दखल घेत आयडियल हेलपिंग हॅन्डचे अध्यक्षा निर्मला केदार यांनी व त्यांच्या टीमने मिळून ब्रदर राहुल वैराळ यांना 2024 चा गौरव पुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण नगर शहरातील बिशप हॉल तारकपूर या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भाग्यश्री मॅडम,राजन नायर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते ब्रदर राहुल वैराळ यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी युवा ख्रिस्ती आघाडीतील युवक गौरव घोरपडे,श्याम वैराळ,अश्विन सोनवणे,अमन ओहळ,अजय डाके,अनिल वाघमारे,अनुग्रह वैराळ,सौरभ क्षीरसागर,महेश साठे,आदी युवक मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page