अहमदनगर (दि.६ जानेवारी):-अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड या ठिकाणी घडलेल्या बहुचर्चित ओंकार भागानगरे हत्याकांडातील आरोपींना सिव्हिल प्रशासन व जेल प्रशासन सहकार्य करत असल्याचा आरोप मृत ओंकार भागानगरे यांचे बंधू तुषार भागानगरे यांनी केला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोपी हुच्चे हा आजारी असल्याचे नाटक करत असून त्यानंतर त्याचे अवैध धंदे चालवत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला असून या संदर्भातील निवेदन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले.
यापूर्वी देखील सबजेल कारागृहामध्ये खोटे आधारकार्ड दाखवून आरोपी हुच्चे यास येवले नावाचा एक ईसम भेटायला जात होता ते देखील आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले,आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी भागानगरे कुटुंबीयांकडून करण्यात आली.त्याला सबजेल कारागृहातून हलवून इतर जिल्ह्यातील कारागृहात टाकावे जर ही मागणी मान्य नाही झाली तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे भागानगरे कुटुंबीयांनी सांगितले.