महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार मिळावा-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाची मागणी-गणेश घुगे;देशातील समाजसुधारकांना भारतरत्न मिळावा यासाठी उपोषणाला बसवावे लागते ही खूप मोठी शोकांतिका-शितल कांडेलकर आम आदमी पार्टी शहराध्यक्षा शिक्षक आघाडी
पुणे (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख गणेश घुगे पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी दि.१ जानेवारी २०२४ पासून उपोषणास बसलेले आहेत.
त्यांची प्रामुख्याने मागणी आहे की,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,अहिल्यादेवी होळकर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,क्रांतिवीर उमाजी नाईक,या महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.त्यांची ही मागणी योग्य असून पुणे शहरातील आम आदमी पार्टीच्या शिक्षक आघाडीच्या शहराध्यक्षा शितलताई कांडेलकर,पूजा वाघमारे महिला आघाडी उपाध्यक्षा आम आदमी पक्ष पुणे शहर,प्रशांत कांबळे शहराध्यक्ष आम आदमी पक्ष सामाजिक न्याय विभाग’ पुणे शहर यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यानी पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला आहे.या वेळी कांडेलकर म्हणाल्या की,या भारत देशातील समाजसुधारकांना भारतरत्न मिळावा यासाठी आपल्याला उपोषणाला बसावे लागते ही खूप मोठी शोकांतिका आहे.
यावेळी मा.मंत्री विजय शिवतारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना आपली मागणी काय आहे हे सांगून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याने व पुणे शहरातील ज्या ज्या संघटनेने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्या संघटनेचे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून सर्व प्रकार सांगून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मा.मंत्री विजय शिवतारे यांच्या आश्वासनानंतर गणेश घुगे यांनी पाच दिवस सलग चाललेले उपोषण स्थगित केले.