श्रीरामपूर (ॲड.प्रशांत राशिनकर):-तालुक्यातील निमगाव केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच गोंडेगाव जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत पार पडल्या.यावेळी निमगाव केंद्रातील जिल्हापरिषद नायगाव जुने या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
कैवल्य रविंद्र दरेकर (इ.१ ली) या विद्यार्थ्याने किलबिल गटात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला,कु.सुप्रिया दिपक राशिनकर (इ.४ थी) हिने बालगटात वक्तृत्व स्पर्धेत बालगटात प्रथम क्रमांक पटकाविला,कु.समिक्षा सुभाष तुपे (इ.४ थी) हिने बालगटात वेशभूषा सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकाविला.कैवल्य रविंद्र दरेकर याने किलबिल गटात वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तसेच कु.वैष्णवी गोरख राशिनकर (इ.२ री) हिने बालगटात हस्ताक्षर स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला,कृष्णा रविंद्र लांडे किलबिल गटात हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात कृष्णा रविंद्र लांडे (इ.३ री) याने दुसरा क्रमांक पटकाविला,कु.श्रुती अविनाश लांडे व श्रावणी निलेश लांडे (इ.२ री) यांनी बालगटात वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला, प्रसाद लक्ष्मण पवार (इ.४ थी) याने बालगटात वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत याने दुसरा क्रमांक पटकाविला.
त्याच प्रमाणे समूहगीत गायन स्पर्धेत लहान गटात केंद्रात तिसरा क्रमांक पटकाविला.या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्रीम.साईलता सामलेटी,शिक्षण विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे,संजीवन दिवे,केंद्रप्रमुख राजू इनामदार,सरपंच राजाराम राशिनकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,उपाध्यक्ष अशोक वाघ,पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.