अहमदनगर (दि.७ जानेवारी):-दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना धारदार शस्त्र व दरोडा टाकण्याच्या साहित्यांसह लोणी पोलीसांनी पिंपरी निर्मळ शिवार,ता.राहाता येथुन जेरबंद केले आहे.
दि. 03 जानेवारी 2024 रोजी लोणी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांचे आदेशान्वये लोणी पोलीस ठाण्याचे पथक रात्रगस्त करीता तसेच लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत अस्थापणा,हॉटेल,लॉजेस रात्रीचे वेळी बंद करण्यासाठी खाजगी वाहनाने रात्रगस्त करीत असताना लोणीकडुन पिंपरी निर्मळ,ता.राहाता कडे जात असतांना लोणी पिंपरी निर्मळ रोडवरील निळवंडे कॅनॉलचे पुलाचे पुढे निर्जन ठिकाणी रात्रीचे अंधारात 05 ईसम हातात चाकु,लाकडी दांडे घेवून रस्त्याने येणारे जाणारे वाहनांना आडवण्याचा प्रयत्न करीत असतांना दरोडा टाकण्याचे तयारीत दिसुन आले.
पोलीस पथकाने त्यांना पकडण्याचे उद्देशाने त्यांचे जवळ वाहन घेवून त्यांना वाहनामधुन उतरुन पकडण्याचा प्रयत्न केला असता 05 ईसमांपैकी (1) बाळु किसन गायकवाड रा.गणेशवाडी शिर्डी,ता.राहाता,जि.अहमदनगर (2) अजित विजय कु-हाडे रा. को-हाळे,ता.राहाता,जि. अहमदनगर (3) विधीसंघर्षग्रस्त बालक रा.शिर्डी बाजारतळ, कालीकानगर,ता.राहाता यांना पकडण्यात आले असुन त्यांचे साथीदार (4) योगेश कु-हाडे (पुर्ण नांव माहीत नाही) रा. वडार गल्ली,राहाता,ता. राहाता,जि.अहमदनगर (5) एक अनोळखी नांव,पत्ता माहीत नाही असे मोटारसायकलवरुन पळून गेले.
पकडण्यात आलेले दरोड्याच्या तयारीत असलेले ईसमांचे ताब्यात दोन धारदार चाकु,एक लाकडी दांडा, मिरची पावडर,सुमारे 25 फुट लांबीचा दोरखंड असे हत्यार व वस्तु मिळुन आलेले असुन या बाबत लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.क्र.1 09/2024 भा.दं.वि.कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. गुन्ह्यात आरोपी क्र.01 व 02 यांना अटक करुन त्यांचे कडे तपास करुन चोरीचे मोबाईल फोन व मोटार सायकल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आहे.
हि कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/युवराज आठरे,पोलीस उपनिरीक्षक श्री.योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. आशीष चौधरी,पोहेकॉ/जोसेफ साळवी,पोहेकॉ/असिर सय्यद,पोकॉ/मच्छिंद्र इंगळे,पोकॉ/रविंद्र माळी, पोकॉ/निलेश सातपुते यांनी केलेली आहे.