ईव्हीएम च्या प्रचारासाठी करोडोंची उधळपट्टी;आम आदमी पार्टीचा तीव्र विरोध जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
पुणे (प्रतिनिधी):-आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून महाराष्ट्रात ईव्हीएम चा प्रचार आणि प्रसिद्धी केली जात आहे.
यावर पुणे शहर आम आदमी पक्षाने मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला असून ईव्हीएम च्या प्रचार आणि प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये आत्ताच का खर्च केले जात आहे. असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे.आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन तसे मागणीचे निवेदन दिले आहे.ईव्हीएम विरोधात सर्वसामान्य नागरिक आवाज उठवत असून दुसरीकडे ईव्हीएम किती चांगले आहे याचा नागरिकांना किती फायदा आहे हे नागरिकांच्या मनात प्रचार प्रसार आणि बिंबवले जात आहे.
व यावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत.यासाठी जो पैसा खर्च केला जात आहे तो नागरिकांच्या दैनंदिन करा मधूनच कट होत आहे.म्हणून आम आदमी पक्षाने ईव्हीएम विरोधात तीव्र विरोध केला आहे.यावेळी आम आदमी पक्षाचे सतीश यादव,अक्षय शिंदे,एम.अली.सय्यद,शंकर थोरात,शिक्षक आघाडी शहराध्यक्षा शितल कांडेलकर,महिला आघाडी उपाध्यक्षा पूजा वाघमारे ई.उपस्थित होते.