अहमदनगर (दि.८ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मध्ये पुन्हा एकदा वर्चस्ववादाची लढाई पहावयास मिळत आहे.त्यातच ‘तुला जास्त माज आला का?, तू मार्केटयार्डचा दादा झाला का?’असे म्हणत एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.
श्रीरामपूरातील वार्ड क्रं. ७ मध्ये गुरूवारी ही घटना घडली आहे.या बाबत फिर्यादी किरण शिंदे यांच्या फिर्यादी वरून गणेश खंडागळे,दिपक खंडागळे,विजय खंडागळे व त्यांचा एक अनोळखी मित्र यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस करत आहे.