Maharashtra247

मंदीर चोरी व घरफोडी करणाऱ्या २ सराईत आरोपींना एलसीबी ने ठोकल्या बेड्या;तब्बल १९ गुन्हे दाखल असलेला ‘मलिंगा’ ताब्यात

अहमदनगर (दि.११ जानेवारी):-नेवासा परिसरात मंदीर चोरी व घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी 57,500/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी श्री.सुभाष एकनाथ चव्हाण (धंदा पुजारी, रा.नेवासा खु,ता.नेवासा) यांनी दि.01 जानेवारी रोजी अनोळखी इसमांनी औदुंबर चौक, नेवासा खु येथील दुर्गादेवी मंदीराचे गेटचे कुलूप तोडुन मंदीरात जावुन 11,000/- रुपये किंमतीची दानपेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरुन नेले बाबत नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 02/2024 भादविक 457,380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन,गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,आरोपी नामे आकाश ऊर्फ मलिंगा जगधने रा.गंगानगर,ता. नेवासा याने त्याचे साथीदारासह सदरचा गुन्हा केला असुन,तो ज्ञानेश्वर कॉलनी मागे काटवनात बसलेला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पहाणी करता बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन संशयीत इसम झाडा खाली बसलेले दिसले.

पथकाची खात्री होताच दोन्ही संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले.त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने व 2) विशाल अरुण बर्डे दोन्ही रा.गंगानगर, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले.त्यांचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे 3) अमर बर्डे (फरार) व 4) बंटा ऊर्फ सौरभ (फरार) दोन्ही रा. गंगानगर, ता. नेवासा यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये सोन्या चांदीचे दागिने,रोख व विविध कंपनीचे 4 मोबाईल फोन असा एकुण 57,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.ताब्यातील आरोपींकडे मुद्देमालाबाबत चौकशी करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवुन लागले.

त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी नेवासा परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने एकुण 5 गुन्हे उघडकिस आलेले आहेत.यातील आरोपी नामे आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द दरोडा तयारी,जबरी चोरी, घरफोडी,चोरी,गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण -19 गुन्हे दाखल आहेत.

ताब्यातील दोन्ही आरोपींना मुद्देमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,ज्ञानेश्वर शिंदे,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरदंले,फुरकान शेख, पोकॉ/किशोर शिरसाठ, जालिंदर माने,बाळासाहेब गुंजाळ,प्रमोद जाधव, चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ/अरुण मोरे यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page