पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू;आंदोलनाला आम आदमी पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा
पुणे (प्रतिनिधी):-पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश भोसले यांनी विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्यांसह बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला आम आदमी पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी त्यांनी महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील विनाकारण बसस्टॉप साठी चालू असलेला मार्ग हा उद्यानामध्ये समाविष्ट करावा, उद्यानामध्ये ग्रंथालयाची निर्मिती करण्यात यावी,पुतळ्यासमोरील भिंत तोडून नवीन प्रवेशद्वार हे आकर्षक व भव्य दिव्य प्रवेश कमान बसविण्यात यावी जेणेकरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा समोरून व्यवस्थित व स्पष्ट दिसेल,दि.६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी सार्वजनिक सुट्टी सरकारने जाहीर करावी,उद्यानामध्ये पिण्याच्या टाकीच्या जागेवर 24 तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करावे,उद्यानाशेजारील परिसर हा धूम्रपान निषेध घोषित करण्यात यावा,उद्यानाच्या वेळेमध्ये दुरुस्ती करण्यात यावी असा वेगवेगळ्या मागण्या महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी आंदोलनात पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयश्रीताई गायकवाड पश्चिम महाराष्ट्र सचिव,रिटाताई मरीन अध्यक्ष पुणे शहर महिला, सोनालीताई धोत्रे सरचिटणीस पुणे शहर,सरलाताई स्वामी व.म.स.अध्यक्षा,शिवाजी गव्हाणे सामाजिक कार्यकर्ते, शरद नाईकवाडे सामाजिक कार्यकर्ते,हनुमंता धोत्रे सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला.तर या धरणे आंदोलनाला आम आदमी पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला,आम आदमी पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सुरेखा भोसले,शिक्षक आघाडीच्या शहराध्यक्षा शितल कांडेलकर,प्रशांत कांबळे,अमित मस्के,विजय लोखंडे,मयूर कांबळे,ॲड.अभिजीत खंडागळे,मिलिंद सरोदे,कुमार धोंगडे,अभिजीत गायकवाड,उमेश बागडे,किरण कांबळे,डॉ.किशोर शहाणे,सरदार विवेक तुपे,ॲड.गणेश थरकुडे,ॲड.सागर बार्गीर ई.उपस्थित होते.