अहमदनगर (दि.१० जानेवारी):-जिल्हा रुग्णालय अहमदनगर ,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, संपूर्ण सुरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेप्ती गाव येथे आयोजित मोफत सर्व आरोग्य तपासणी शिबिरात ५० रुग्णांची मोफत तपासणी व मोफत समुपदेशन करण्यात आले.
यावेळी नेप्ती ग्रामपंचायतच्या सरपंच सविता जपकर,उपसरपंच संजय जपकर,राहूल दौंडे, समुपदेशक,प्रांजली झांबरे प्रयोग शाळा तंत्रज्ञ, राधाकीसन पाटोळे जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग,श्रीमती.वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख संपुर्ण सुरक्षा केंद्र व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरावेळी सरपंच सविता जपकर यांनी आपल्या भागात आरोग्याच्या सुविधा प्राप्त होतात लोकांनी लाभ घ्याव्या तसेच गरोदर माता यांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित तपासण्या करून घेतल्या पाहिजे.
खेडे गावातील लोक आपल्या आरोग्याच्या बाबींवर लक्ष देत नाही यासाठी आरोग्य यंत्रणा आपल्यासाठी विविध गरजेच्या तपासणी करून जनजागृती करतात, त्याचा फायदा घेणे महत्त्वाचे आहे.या शिबिराप्रसंगी बोलताना राहूल दौंडे यांनी आरोग्य सेवा,HIV, गुप्तरोग यावर मार्गदर्शन व समुपदेशन करून प्रत्येकाशी संवाद साधला.आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे त्याच बरोबर इतर तपासणी बरोबर एच.आय.व्ही. तपासणी करून आपली स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे,गरोदरपणामध्ये आपण एच.आय.व्ही.ची तपासणी करणे गरजेचे आहे.यावेळी रुग्णांशी बोलताना संपूर्ण सुरक्षा केंद्र बाळू इदे,वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख यांनी रुग्णांना आरोग्य व तपासणी बाबत समुपदेशन केले.
तसेच एच.आय. व्ही ची तपासणी आपण दर तीन महिन्याला करणे गरजेचे आहे. तसेच काही संदर्भित सेवा लागत असेल तर जिल्हा रूग्णालय संपूर्ण सुरक्षा केंद्र ओपीडी ४४ ला भेट देऊन सेवा घ्यावी या माहिती दिली.तसेच रक्त तपासणी बाबत कोणकोणत्या चाचण्या केल्या जातील तसेच तपासण्या का करून घ्याव्या आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित तपासण्या करणे का गरजेचे याबाबत प्रांजली झांबरे प्रयोग शाळा तंत्रज्ञ,यांनी माहिती दिली.तर नाव नोंदणी वैशाली कुलकर्णी यांनी करून रुग्णांची बीपी चेक अप दरम्यान प्राथमिक माहिती घेतली.एकूण शिबिरांत ३७ लोकांनी रक्ताच्या विविध चाचण्या केल्या.थायरॉईड, उच्च रक्तदाब,मधुमेह,लिव्हर विकार,वजन,उंची कावीळ, फुफुसाचे विकार,दमा निमोनिया,संसर्गजन्य आजार डेंगू,मलेरिया,एच.आय.व्ही, गुप्तरोग,किडनीचे टेस्ट, कॅन्सर सिरम कॅल्शियम, शुगर, हिमोग्लोबिन, इत्यादी मोफत रक्त तपासणी केल्या गेल्या.शिबिर यशस्वी ते साठी संजय जपकर यांनी परिश्रम घेतले तर सरपंच सविता जपकर यांनी आभार व्यक्त केले.