
पुणे (प्रतिनिधी):-लोकशाही न्यूज चैनलवर सरकारने बंदी घातल्यामुळे याचा निषेध म्हणून पुणे शहरातील आम आदमी पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात आले.
लोकशाहीविषयी व खर बोलणाऱ्यांचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा यावेळी निषेध केला.निर्भिड, इमानदार पत्रकारितेच्या मागे आम आदमी पक्ष पूर्ण ताकतीने उभा आहे.असे वक्तव्य आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या शहराध्यक्षा शितल कांडेलकर यांनी केले.
यावेळी आम आदमी पक्षाचे प्रशांत कांबळे, महिला शहराध्यक्षा सुरेखा भोसले,अमित मस्के,विजय लोखंडे,मयूर कांबळे,ॲड.अभिजीत खंडागळे,मिलिंद सरोदे,शितल कांडेलकर,कुमार धोंगडे,अभिजीत गायकवाड,उमेश बागडे,किरण कांबळे,डॉ.किशोर शहाणे,सरदार विवेक तुपे, ॲड.गणेश थरकुडे,ॲड.सागर बार्गीर ई उपस्थित होते.