Maharashtra247

राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने १६ जानेवारी रोजी बालविवाह मुक्त जागृती सायकल यात्रेचे आयोजन 

अहमदनगर (दि.१० जानेवारी):-राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने १६ जानेवारी रोजी बालविवाह मुक्त जागृती सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्नेहालय संस्थेच्या युवा निर्माण प्रकल्पाने आतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक सद्भावना सायकल यात्रांचे आजवर सातत्याने आयोजन केले.नववर्षाचा आरंभ बालविवाह मुक्तीचा प्रचार सायकल यात्रेद्वारे करण्यात येणार आहे.अहमदनगर जिल्हा प्रशासन,स्नेहालय संस्था,रोटरी क्लब ऑफ अहमदनगर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर, जिल्हा न्यायालय अहमदनगर,अहमदनगर जिल्हा सायकल असोसिएशन,अहमदनगर जिल्हा महिला व बाल विकास विभाग,आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह,बालकांच्या हक्क आणि बेटी बचाव बेटी पढाव, जनजागृती करण्याकरिता या सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्नेहालय परिवार मागील ३५ वर्षांपासून समाजातील वंचित-उपेक्षित-सर्वहारा वर्गासाठी काम करते.त्यात महिला-मुली-दिव्यांग-दुर्लक्षित समाज घटकांचा आहे. बालशक्ती आणि युवाशक्ती हाच राष्ट्र उभारणीचा पाया आहे. तरुणाई, बालकांना व सर्व नागरिकांना बालविवाह मुक्त समाज सद्भावनेवर आधारित भावधारा परिचित करून देण्याचा आमचा उद्देश आहे. आपली संस्था,आपले सहकारी आणि कार्यकर्ते, यांच्या सहयोगातुनच हे शिवधनुष्य पेलायचे आहे.यात्रेमुळे अनेक सामाजिक संस्था-प्रकल्प-समाजसेवक यांची अनुभूती सहभागी सर्व युवा – युवती, बालके आणि सर्व नागरिक घेतील.

१० दिवस ५०० कि.मी.

येत्या 16 जानेवारी 2024 ते 26 जानेवारी 2024 या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ही सायकल यात्रा होत आहे. ही यात्रा *स्नेहालय एम.आय.डी.सी., पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, अकोले, संगमनेर, राहुरी, सोनई, शनी शिंगणापूर, अहमदनगर, स्नेहालय या तालुके आणि तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून* जाईल. या बालविवाहमुक्त भारत, मानवाधिकार युक्त समाज सद्भावना सायकल यात्रेत ६० व्यक्ती होऊ शकतात.महाविद्यालयीन विद्यार्थी, पुरुष तसेच जास्तीत जास्त महिला-मुली यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तरी सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी *मो.- 9011026472 आणि 9011026495* या क्रमांकावर संपर्क साधने. असे आव्हान संयोजकाने केले आहे.

फॉर्म लिंक https://www.snehalaya.org/volunteer-youth-camp

यात्रा उद्देश

बालविवाह ही मागील काही शतकांपासून चालत आलेली भारताची एक प्रमुख समस्या आहे. पण आजही बालविवाहाचे प्रमाण भारतात ४७ टक्के, तर महाराष्ट्रात ३५ टक्के इतके आहे. लोकसंख्यावाढीशी थेट संबंध असणाऱ्या बालविवाहांमुळे मातामृत्यू, गर्भपात, कुपोषित अर्भके (राष्ट्रीय प्रमाण ४२ टक्के), याचबरोबर स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरणासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत. महिला अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये बालविवाह झालेल्या मुलींचे प्रमाण खूप मोठे आहे. म्हणूनच शिक्षण आणि आरोग्याचे उद्दिष्ट जर १०० टक्के साध्य करायचे असेल तर बालविवाहाचे प्रमाण शून्य टक्के केल्याशिवाय गत्यंतरच नाही इतका त्यांचा अन्योन्यसंबंध आहे. या सायकल यात्रेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील हक्कवंचित बालकांपर्यंत पोहचण्याकरिता आणि त्या बालकांना काळजी, संरक्षण, शिक्षण आणि भविष्य देणाऱ्या सुसंघटीत स्वयंसेवक, बालमित्र व सामन्य लोक गटाची निर्मिती केली जाणार असून यात शासकीय व निमशासकी यंत्रणांशी सहसंबंध प्रस्थापित करून बालकांच्या अधिकारांविषयी जनजागृती केली जाणार आहे. बालकांना व सर्व नागरिकांना बालविवाह मुक्ती मिशनची ओळख करून दिला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात ही सायकल यात्रा काढण्याचा आमचा मानस आहे. अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करुन बालविवाह मुक्त भारताची प्रेरणा देशात निर्माण हा स्नेहालयचा बालविवाह प्रतिबंधक उडान प्रकल्प करणार आहे. आत्मविश्वास आणि जगण्याची नवी दिशा ही यात्रा देणार आहे.

संयोजक टिम:-नितीन थाडे प्रमुख सल्लागार,माधवराव देशमुख अध्यक्ष रोटरी क्लब अहमदनगर सायकल असोसिएशन,दिपक गुजराती सचिव रोटरी क्लब अहमदनगर,चंद्रशेखर मुळे अध्यक्ष सायकल अशोशिएशन अ.नगर जिल्हा,हनीफ शेख संचालक –स्नेहालय,डॉ. सौ. सुधा कांकरिया प्रमुख सल्लागार,ॲड.बागेश्री जरंडीकर मानद संचालक,डॉ. मनिषा लढ्ढा मुख्य सहयोग,डॉ. सौ. अंशु मुळे विश्वस्त –स्नेहालय,विकास सुतार,समन्वयक 9011026472,प्रविण कदम,समन्वयक 9011026495,स्वाती ढवळे संयोजक 7620009224,दिक्षा वावरे संयोजक 7030157743,सीमा जुनी संयोजक 9284956067,Email yuvanirman@snehalaya.org udaan@snehalaya.org

Visit @ www.snehalaya.org

You cannot copy content of this page