जॉब…११ जानेवारीला जागेवर मिळणार नोकरी शहरातील सहाय्यक आयुक्तांनी पत्रक काढत केले प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
अहमदनगर (दि.९ जानेवारी):-अहमदनगर जिल्हयातील उमेदवारांना खाजगी आस्थापनेमध्ये विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर नोकरीची संधी) चे ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११-०० ते दुपारी २-०० या वेळेत प्रशासकीय इमारत पहिला मजला, टि.व्ही.सेंटरजवळ अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले असुन इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त नि.ना.सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये जिल्हयातील दोन ते तीन नामांकित कंपन्यांचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करणार आहेत.इच्छूक एसएससी,एचएचसी,सर्व शाखेतील पदवीधर (बीए/बीकॉम एमकॉम) आदी शैक्षणीक पात्रता धारक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकांकडे अप्लाय करावे.
याबाबत अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0241-2995735 किंवा प्लेसमेंट ड्राईव्ह समन्वयक यंग प्रोफेशनल वसीमखान पठाण मो.नं. 9409555465 यांच्याशी संपर्क साधावा,असेही कळविण्यात आले आहे. नगरकरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.